About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Friday, 28 July 2023

ओढ

'तू, मी आणि रिमझिमता पाऊस'
मेंदीच्या कोवळ्या वयात लिहिलेल्या ओळी;
मेंदी रंगली, रापली, उताराला लागली,
वहीत बंद आहेत, अजूनही. 
वाचणारे डोळे, ऐकणाऱ्या कानांची ओढ
हिरव्या शाईत रंगल्या ओळींना, अजूनही.

कोणी आले, ऐकायला आतुर, 
भाषा उमजली नाही.
कोणी आले, वाचू पाहिले,
भाव समजला नाही.

तू, मी आणि रिमझिमता पाऊस
चिंब भिजून आठवणींत, वहीत बंद, हसणारे.
तू, मी आणि रिमझिमता पाऊस
मेंदीच्या कोवळ्या वयात उमटून,
अनाम ओढीच्या अंताला आसुसणारे.

अनोळखी कोपऱ्यात बंद वहीत 
हिरव्या स्वप्नांचे निशाण, अजूनही. 
वाचणारे डोळे, ऐकणाऱ्या कानांची ओढ
शाई फिटत चालल्या ओळींना, अजूनही.

✍🏼सोनल

2 comments:

  1. सुंदर ओळी, बंद वहीत कितींकाही दडलेल्या लपलेल्या भावना

    ReplyDelete
  2. धन्यवाद अल्पा मॅडम 😌🙏🏼

    ReplyDelete