About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Friday, 30 December 2016

गुज़रता साल



पल...
      गुज़रते रहतें हैं
      अपनी रफ़्तार क़ायम रखे 
                 वक़्त बहता रहता है।


हम...
      एक छोटेसे तिनके की तरह हलकेसे
      इस वक़्त की नदिया में आ कर गिरतें हैं।
      थोड़ासा उम्र का फ़ासला काँटते हैं बस्
      और इसी नदिया में कहीं ग़ुम हो जातें हैं।
       इस छोटेसे फ़ासले में 
       जानें क्या क्या कर गुजरतें हैं।
       आगे बढ़ते बढ़ते कई दफा गिरतें हैं,
       उठतें हैं, रुकतेँ हैं, दौड़तेँ हैं
       पर सफ़र पूरा कर ही दम लेते हैं...
                नहीं, 
                       असल में दम छोड़तें हैं।



इस छोटेसे सफ़र को कई सारे टुकड़ों में बाँट देतें हैं हम
एक टुकड़ा नए साल के नाम से जाना जाता है।

साल...
       हर साल बदलता है।
       वैसे तो हर पल कुछ नयी सीख़ दे कर जाता है,
       मगर हर साल दिसंबर में 31 को लोगों को सब याद आता हैं।
       पक्के कच्चे, बुरे अच्छे सारे पल,
       सारी यादें जैसे इस एक दिन में सिमटी सी जाती हैं।
       पूरा गुज़रता साल कुछ ही पलों में हम मुड़कर देखतें हैं।
       मुस्कुराहटें, आंसू, ग़म और खुशियाँ
       सारे जैसे एक साथ नम हो जातें हैं।
       इन्हें यूँही बुत बन कर देख सकते हैं हम।

हम...
       चौकट पर आ कर गुज़रते साल का हाथ छोड़ते
       नए सवेरे की ऊँगली थामने बेक़रार रहतें हैँ।

पल...
      गुज़रते रहतें हैँ
      हम भी बढ़तें रहतें हैँ इनकी तरंगों पर।
      खोना तो होता ही है सब को, इस सफ़र में किसी मुकाम पर...
      और हम, नयी मंज़िलें ढूँढते रहतें हैं।
       एक दिन एक छोटेसे बुलबुले की तरह हलकेसे
       इस वक़्त की नदिया से हम उड़ भी जातें हैं।

पल गुज़रते रहतें हैं,
     अपनी रफ़्तार क़ायम रखे वक़्त बहता रहता है।
हम चौकट पर आ कर गुज़रते साल का हाथ छोड़ते,
      नए सवेरे की ऊँगली थामने बेक़रार रहतें हैँ।


-

नये साल की शुभकामनाएँ

                                           सोनल 
                                                         :)

Saturday, 3 December 2016

पुस्तकं

(एखादा छंद, एखादी कला जोवर सोबत आहे तोवर या जगात कोणी एकटं पडेल असं मला वाटत नाही... असाच सतत सोबत असणारा एक छंद - भावसौंदर्य व्यक्त करणारी पुस्तकं...)

मैत्री असावी पुस्तकांशी
एकाकीपण सुसह्य होतं

आपली माणसं, आपलं प्रेम, आपली श्रद्धा आणि आपला विश्वास...
खोटी भुलावण आपणच आपली करत असतो,
आणि या आपल्यांची सोबत सुटल्यावर एकाकी आपणच रडत बसतो.

अशा वेळी फक्त पुस्तकं येतात साथीला.
हळूच डोळ्यांतून हृदयात उतरणं जमतं त्यांना...
हृदयाला भिडलेली पुस्तकं मग कधी उशाशी, कधी कुशीशी येतात;
एखाद्या जीवलगासारखी.
ती रुसत नाहीत, राग धरत नाहीत, ना कधी हट्टाला पेटतात.

जे आहे ते सरळ स्वच्छ;
उघडून अंतरंग सारं सांगतात.
कोणती कोडी घालत नाहीत, की कोणत्या अटी.
स्वभाव तर किती खुला, आसमंतासारखा निर्मळ...
सागरासारखी खोली आणि एकच काय ते जगण्याचं तत्व,
'तू मला वाचून मला समजून घ्यायचा प्रयत्न केलास,
मी तुला माझा सारा आनंद, सारं प्रेम देतो.'

आपला जीव जडलेली माणसंही या पुस्तकांसारखी असती तर...?!!

:)
   -
     सोनल

Thursday, 27 October 2016

फुलाने...

फुलाने फुलायचं असतं;
सौंदर्य वाटत जगायचं असतं.

त्याने विचार करायचा नसतो
दगडाच्या पायाशी निर्माल्य होणार
की कोणा प्रेमींना जोडणारा दुआ म्हणून
एखाद्या वहीत बंदिस्त होणार;
त्याने विचार करायचा नसतो
कोणा ललनेच्या केशसंभारास रौनक ठरणार
की कोणा मृतास अखेरची
गंधित श्रद्धांजली ठरणार...

फुलाने फक्त फुलायचं असतं;
सौंदर्य उधळत जगायचं असतं.

झाडावरंच कोमेजून सारी फुलं संपत नाहीत
प्रत्येकाचं प्राक्तन असतं वेगवेगळ्या शाईत;
निसर्गदत्त असतं मात्र प्रत्येकाचं सौंदर्य
खुलवायचं असतं ज्याचं त्याने अंतरासहित.




एवढंच लक्षात ठेवायचं असतं,
आपलं नैसर्गिक दान लुटायचं असतं
त्याचा रंग-गंध जाणण्याचं सौंदर्य सर्वांकडे नसतं,
साऱ्यांकडून तारीफेचा अट्टाहास नसावा
ती न करणाऱ्यांबद्दल देखील कधी दुःस्वास नसावा,
जपावी फक्त निकोप वृत्ती
स्वतःस जगल्याचे समाधान चित्ती.
जाणकारांच्या डोळ्यांतील कौतुक सार्थकतेचा दाखला असला तरी
अजाणांना क्षमादान देत आपलंच अंतर उजळायचं असतं.

निरागस फुलणं जपायचं असतं
फुलाने निर्मळच संपायचं असतं...!


 - सोनल 

Monday, 19 September 2016

वेल-सॉर्टेड आयुष्य

आपलं आयुष्य कसं वेल-सॉर्टेड असतं. प्रत्येक कामाचे, प्रत्येक छंदाचे, प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक नात्याचे वेगवेगळे कप्पे नकळत बनलेले असतात आपल्या मनात. हो, हे वेल-एक्सपांडेबल सुद्धा असतं. नवीन येत राहिलं तर जागा बनत जाते, जुनंच वृद्धिंगत होऊ लागलं ती विस्तारत जाते. काही कमी झालं तर पोकळी निर्माण होते हेही तितकंच खरं!

बरेचदा ही पोकळी रेफिलेबल, रिप्लेसेबल असते; कधी कधी मात्र तिच्यात तितक्याच एकरूपतेने सामवणारं असं दुसरं काही मिळत नाही. मग एकाकीपणाची झलक त्या जाळीतून दिसत राहते.

अर्थात एककीपणाच्या अस्तरावर जसा जीव जन्म घेतो, तसा आईच्या नात्यापासून पुढे इतर कप्पे रचत जातो. म्हणजेच, कमी झालं काही की सजवलेल्या पोकळीतून बॅकग्राउंड दिसतं आणि अस्वस्थता येते. आपल्या विश्वाची सजावट करण्यासाठी आपण नेमून दिलेले कलाकार असे अचानक नाहीसे झाले की हे होणारंच.

या कप्प्यांची एक मजा अशी, की आपण त्या त्या कप्प्यातल्या आपल्या रोपांना वेळोवेळी हवे तसे प्रेमाचे आणि काळजीचे खत-पाणी दिले की ती आपल्या आनंदासाठीच डवरतात. कधी रोगीट फांद्या काढून योग्य वाढीस वेळ द्यावा लागतो; कधी तळाची माती सुयोग्य करावी लागते. ठराविक कालावधीने धूळ झटकावी लागते.

प्रत्येक कप्पा आपापलं असं व्यक्तिमत्व घेऊन जगत असतो. सगळ्या रंगांच्या धाग्यांनी निर्गुण अस्तराला शोभाच येते. आणि खुलून दिसतो आपला जीवनपट! हर क्षण नाविन्यपूर्ण, हर क्षण रोमांचक, हर क्षण उत्सुक आणि हर क्षण सुंदर... फक्त या सजवलेल्या कप्प्यांमुळे!

काही नाती मात्र अशी असतात की त्यांना एखादा कप्पा पुरतंच नाही. एका लहानशा कप्प्यापासून सुरू होऊन ती अफाट विस्तृत व्हायला लागतात. अशा वेळी आपसूक त्याचं क्षितिज रुंदावत जातं, आणि अस्तरावर एक मोठा रंगीन असा पट त्या नात्याचा बनतो. आता आपल्या एकाकी बॅकग्राउंडपुढे  फोरग्राउंड म्हणून हा पट स्वतःच्या अस्तित्व-छटा आपल्या आयुष्यावर उमटवत राहतो.
                
या विस्तृत क्षितिजाचे दोन मानकरी असतात. 
पहिले, आरंभापासूनचे आपले सोबती - आदरणीय जन्मदाते. 
दूसरे, मागाहून येऊनदेखील स्वतःच्या रंगांत अलवार आपल्याला तन्मय करणारे आपले प्राणप्रिय जीवलग! 
हे जीवलग छंद, मित्र, कला यांतले कोणीही असू शकते. या विस्तारलेल्या पटावर छंद कलात्मक, कला मैत्री तर मित्र छंदोमय झालेले असतात.
                
ही क्षितीजे, कप्प्यांचं विश्व कधी कोसळलंच तरी खंबीर सख्य निभावत असतात. आपले अस्तित्वाचे अस्तर न उसवता त्याला मायेने सुशोभित करत असतात; नवी ओळख देत असतात. 

आपलं आयुष्य हे जसं वेल-सॉर्टेड असतं, तसंच ते आपल्याही नकळत वेल-मैनेज्ड देखील असतं.
या नकळत सुरळीत घडवल्या जाणाऱ्या कुशल व्यवस्थापनासाठी निर्मिकाचे आभार मानावे तितके कमीच! 
हे सुंदर आयुष्य लाभले, भरून पावले. याहून सुंदर काय असावे?


:)
सोनल

Wednesday, 22 June 2016

मी झाड एक वठलेलं...


(असंच एकदा पेन्सिल-स्केच काढत बसले होते पुस्तकातल्या वठलेल्या, अपर्ण  वृक्षाचं. ते पाहून मित्र म्हटला, "काय ते सुकलेलं झाड काढतेयस? फुलांचं, फळांचं बहरलेलं झाड काढ की..." तो म्हटला खरं; त्याच्याकडे एक दुःखद कटाक्ष टाकला, आणि ते झाड होऊन कधी माझा पेन त्याला उत्तर द्यायला सावरला कळलं नाही...)
 


मी झाड एक वठलेलं 
तुझ्या डोळ्यांना न पटलेलं 

तुला ठाऊक आहे?
तुझा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून काही मी असा नव्हतो;
तुझ्यासारखाच बहारदार, डौलदार होतो...
लहानशा बीजातून रोपटं, आणि रोपट्याचा वृक्ष झालो होतो.
अंगा-खांद्यावर बागडणारी चिमणी पाखरं होती,
फळांवर गुजराण करणारी कित्येक लेकरं होती...
कुशीत माझ्या थकवा घालवायचे श्रमिक,
विसावा म्हणून माझी सावली सर्वांची लाडकी होती.

हळू हळू वय झालं;
पाऊस, वारा, उन्हं, सारं झेपेनासं झालं...
पाना-फुलांचे एक-एक अलंकार उतरवावे लागले देहावरून,
तेव्हा कुठे हे रुक्ष खोड फांद्यांना धरून उभं राहू शकलं.
मनुष्य ना तू?
तुझंही वय होणार;
सुरकुतलेला चेहरा पाहून तू स्वतःला रुक्ष, वठलेला का म्हणणार?
निसर्गाचं चक्र कोण फिरवू शकलं आहे?
जे जे बहरलं, ते ते संपताना सुकलं आहे...!
सौंदर्य दिसणार नाही आता तुला माझ्यात,
आणि तुला ते दिसावं अशी माझी अपेक्षाही नाही;
मनुष्याला तशीही सवय आहेच प्रत्येक गोष्टींना व्याख्येत बसवायची,
सौंदर्य ही संकल्पना ही त्यातून सुटलेली नाही.

मी सुंदर आहे माझ्यासाठी,
कारण सार्थ जीवन जगलो आहे मी;
जे जे त्याने दिलं ते दान करून 
आता शेवटाला टेकलो आहे मी...
एक आहे शेवटची इच्छा,
पूर्ण करशील?
कोणा गरीबाची चूल पेटवायला इंधन नसेल,
कोणा चुकल्या वाटसरूला नदीपार जायला साधन नसेल,
कोणा गांजल्या जीवाला आसरा नसेल; तर तोड मला...
संपून ही कामी येण्याचं चिमुटभर सौंदर्य 'तू' या रुक्ष वठलेल्या झाडाला दान करशील??


                            
                                -
                                     सोनल

Wednesday, 4 May 2016

आरसा





(काल एक मोठा आरसा गाडीवर पायाशी ठेऊन आणताना जाणवलं, इतर वेळी वळणावर, खड्डे आणि गतीरोधकांवरही बऱ्यापैकी बेफिकीर गाडी पळवणारी, उडवणारी तीच मी, किती अलगद पाय देखील न लावता आरस्याला जपत तीच गाडी चालवत घरापर्यंत पोहोचले.
तेव्हा आयुष्याशी जाणवलेलं हे सांधर्म्य...) 

आरसा जपताना
खूप सांभाळून चालावं लागतं.
जराशी नजर हटली
पाऊल धक्क्यावर अडखळलं;
तोल सावरता नाही आला तर,
तडा जाणार किंवा
आरसा फुटणार...

असाच आरसा जपावा
आयुष्यभर...
ज्यात स्वतःला पाहताना कुठेही 
तडा नाही दिसणार,
स्वतःस स्वतःच्या डोळ्यांनी न्याहाळताना
नजरेला भीती अन् पश्चात्ताप यांची 
काच नाही रुतणार;
दिसेल फक्त सरळ निर्मळ प्रतिबिंब!

-
सोनल
:)
                          

Wednesday, 20 April 2016

काश

काश 
यह सही होता
उम्र का तकाज़ा दोस्ती को कभी ना होता...

सभी झगड़ें उसी मासूमियत के साथ सुलझाएँ जातें
काश
हम भी कभी दिल बड़ा कर दोस्त की गलतियाँ भुला पातें...

झगड़ें कितने भी बडे हो, दोस्त की मुस्कराहट जज्बातों से बढ़कर होती
काश
आज भी नादानियों को माफ़ करने की मासूम समझ जिंदा होती...

जिस दोस्त की हम जान है वह कभी सहम जाए
तो उसे बड़ों की तरह सँवारने की ताक़त होती
काश
कभी हाथ थामें हँसते थे जिसके
उसीको रुलातें अपनी भी आँखे भर आती...

दोस्त से चुप्पी कुछ घंटें ही टिक पाती
काश
जिस दोस्त का दिल मासूम बच्चा ही है
उसके अल्हड़ मगर सच्चे प्यार में अपनी ख़ुद्दारी भी हार जाती...

काश 
यह सही होता
उम्र का तकाज़ा दोस्ती को कभी ना होता...


                                                             -
                                                                 सोनल

Wednesday, 24 February 2016

भूकंप


(मानवी भावना आणि निसर्ग यांच्यात नेहमीच सांधर्म्य असतं असं माझं वैयक्तिक  मत आहे. मानवी मन खूप विचित्र आणि क्लिष्ट असतं असं म्हणतात. 
मला वाटतं, खूप सहजतेने ते निसर्गाशी जोडलं गेलेलं असावं. कदाचित् , कोणे एके काळी भूकंप आणि मनाची पडझड एकाच वेळी झाल्याने हे सुचलं असावं...)


हो, आज खूप काही हादरून गेलंय
माझ्यासहित...
खूप पडझड होऊन गेली.
काही करू शकत नव्हते मी ही,
खळबळ शिगेला पोहोचली होती अंतर्गत
तिचे पडसाद बाहेरच्या त्यांच्या विश्वावर उमटले.


                                               काय करू?
                                               आतली शल्य उघड बोलता येत नाहीत कधी
                                               धुमसत राहतात आतल्या आत...
                                               वर कर्तव्य आणि जबाबदारीने शांत स्वरूप धरलेलं असतं
                                               तेव्हा त्यांना आठवण राहत नाही माझ्या अस्तित्वाची...
                                               त्यांच्याशिवाय मी नाही असं नक्कीच नाही
                                               मी स्वयंभू आहे!


आपण जे विश्व मायेने सांभाळतो
त्यालाच जेव्हा आज तडा गेला आहे,
आज त्यांनी माझ्या अस्तित्वाचा बोलबाला केला आहे.
तेही स्वयंभू आहेत
पण एकत्र बांधलो गेलो आहोत आम्ही नैसर्गिक नात्याने.


                                               त्यांना बोलून भाव व्यक्त करता येतात...
                                               माझं काय?


क्षमा मागावी असा गुन्हा मी नाही केला,
पण त्यांच्या अश्रूंचं ओझं मात्र झालं आहे...
दुःख झालं आहे,
माझा अंतरातील कंप त्यांना भोगावा लागत आहे...
जीव लावलाय ज्यांवर त्यांना माझं शल्य बोचू नये,
माझ्या दुःखाचं माप त्यांनी मोजू नये...


                                               वाटतं, माणूस असते तर पश्चात्ताप व्यक्त करता आला असता;
                                               त्यांच्या अश्रूंना माझ्या अश्रूंनी सावरता आलं असतं.


दुःख मोठं जितकं तितका मोठा हादरा बसतो
त्यांनी सांभाळून घ्यावा एवढा क्षुल्लक तो नसतो.
अपेक्षा नसते माझीही त्यानी मला सावरावं,
जे त्यांना शक्य नाही तो माझा हट्टही नसतो...
म्हणूनच कदाचित वेगळी असून मी त्यांची आहे
त्यांच्यासोबत आज मी ही हादरून कोसळून गेले आहे.
                                               
                                               माझे शल्य त्यांचे अश्रू दोन्ही वाहून गेले आहे
                                               पुन्हा शांत अंतराने दुःख साहून नेले आहे.


-
सोनल

Monday, 15 February 2016

प्राजक्त


आज प्राजक्त मुक्त बरसला...
तसा दर पहाटेचा बरसतोच;
आज तो मला दिसला.
थांबले जाऊन त्याखाली...

टपटप पडणारी केशरी पांढरी फुले
त्यांचा धुंद परिमळ
पार काळजात जाऊन हसला.
माझी सकाळ सुगंधी झाली,
कृत्रिम मुखवट्यांचा विसर पडला.
वाटलं,
'रोज, नाही, सतत इथेच बसावं
या प्राजक्ताच्या निर्मम सान्निध्यात
त्यासारखं किंचित जगता येत का पहावं.'

तर म्हटला,
'रोज नको
पण येत जा अधुन-मधून;
अंधारानंतरच्या प्रकाशाची मौज काही औरच असते.
नेहमी हा काळा पत्थर सुस्त पडून राहतो
तुझ्यामुळे आज खुलून हसताना पाहिला.
मला सुद्धा मिळू देत तो आनंद 
असाच तुझ्यासारखा,
 निर्मळ सचेत
निद्रिस्त अचेताला मिळण्याआधी 
जागृत चैतन्यावर बरसण्याचा...!'

आज प्राजक्त मुक्त बरसला... 


-
सोनल :)

Thursday, 21 January 2016

the LIGHT

 
Chetan Bavdhankar, PC: Ishan Shinde


In the absence of light,
it's dark all around...
Without a curious sight,
it's inanities surround...!

With each photon received
brain gathers facts in the nature;
with all the collected past,
it ponders in the present
& wonders for the future...!

To honour this electromagnetic radiation
is a human kind's chief duty;
we were, we are &
we will always be possessed by
its Natural Endless Beauty...!

- a curious observer,
  $on@l








Tuesday, 12 January 2016

ग़म



जो कुछ ग़म जिन्दगी से बडे लगते थे
उन्हें इक बार हिम्मत जुटाकर हाथ थाम कर कंधे पे उठा लिया 
और कहा,

"देखो,
जिन्दगी तुमसे बडी ही नहीं, 
ख़ूबसूरत भी है..."

सारे सहम कर तब से सिकुड़से गएँ हैं
छोड़ दिया हैं हमें परेशान करना

अब तो खुद में भी ख़ूबसूरती ढूँढने लगें हैं सब...!



-
   :)
      सोनल

Monday, 4 January 2016

Time: The Guru

2016 has started teaching new lessons from its beginning itself...!
Haha :D
I am ready to learn happily 2016. :)


1st Lesson:
Trust the TIME

Bestie does not have time to talk with you, and is going to be out of contact for more than a couple of days; also is reluctant to convey the reason. Some of the plans which were considered to deliver the happiness are cancelled suddenly by loved one. 

You are now scratching your head, angry with both of your close ones. Perfectly sad for your own trust about being the priority and being loved in the same manner you do. 
You are wonderfully mad at people you love the most.

With the dead dreamy mood, you are just passing the time as it is coming forward with no more hopes and wishes.
As you are driving the time with just go face, suddenly something sparkles in front of you.
The best, most awaited, most cherished moment unexpectedly shines.
All you can do is, forget all the pain you had in past few moments, and can't stop being happy (sometimes with tears expressing the overflow of your inner joy).

So, beyond all you can see as negativity there is a hidden treasure of the blessed outcome from your deeply trusted faith. Temporary pain gets dissolved into loads of happiness. 
Enjoy the mist hiding wonders for you in very next moments :)

 Finally, you find these helpful to hope and dream...
  • Always believe in the seeds you have sown.
  • For an optimist, negativities are much temporary.
  • Trust the time has something hidden in future moments, to make you feel heaven.
Trust the TIME :)


Happy learner,
Sonal :)