About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Wednesday, 12 April 2017

'...हा'

हा म्हणजे खूपच भारी आहे बुवा...

भले भले ढेपाळलेले खाड्कन् जागवतो;
उर्जेसाठी आसुसलेल्यांची तहान
हा अगदी मनापासून भागवतो.


याला घेतल्याशिवाय सकाळ होऊच शकत नाही,
हा सोबत असला तर रात्र सुद्धा थकत नाही.
हा म्हणजे खूपच भारी आहे बुवा...

एकदा सवय झाली की
याच्याशिवाय राहवत नाही ,
दुष्काळात कधी हा सापडलाच तर
आनंद गगनात मावत नाही.


अड्डयावर 'चांडाळ-चौकडी' सोबत टवाळगिरी करताना,
टपरीवर त्या एका 'स्पेशल' सोबत उगाच गप्पा मारताना,
एकांतात बसून आपल्याच राज्यात ऐलापासून पैलापर्यंत फिरताना,
मनाच्या सगळ्या टप्प्यांवर एकमेव निःपक्ष साक्षीदार -
हा, खूपच भारी आहे बुवा...

मौसम कुठलाही असो, याचा मान सर्वत्र


तरी पावसात जरा जास्त
च खाऊन जातो भाव;
भलता रसिक, भलताच कडक, मेलेल्या मूड ला संजीवनी देणारा
याला अमृततुल्य उगाच म्हणतात का राव...!

हा म्हणजे जरा जास्तच भारी आहे बुवा...
आम्हा चहाबाजांना वेळेला "चहा"च हवा ! ;)


-
              सोनल 
                          :)