(मानवी भावना आणि निसर्ग यांच्यात नेहमीच सांधर्म्य असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. मानवी मन खूप विचित्र आणि क्लिष्ट असतं असं म्हणतात.
मला वाटतं, खूप सहजतेने ते निसर्गाशी जोडलं गेलेलं असावं. कदाचित् , कोणे एके काळी भूकंप आणि मनाची पडझड एकाच वेळी झाल्याने हे सुचलं असावं...)
हो, आज खूप काही हादरून गेलंय
माझ्यासहित...
खूप पडझड होऊन गेली.
काही करू शकत नव्हते मी ही,
खळबळ शिगेला पोहोचली होती अंतर्गत
तिचे पडसाद बाहेरच्या त्यांच्या विश्वावर उमटले.
माझ्यासहित...
खूप पडझड होऊन गेली.
काही करू शकत नव्हते मी ही,
खळबळ शिगेला पोहोचली होती अंतर्गत
तिचे पडसाद बाहेरच्या त्यांच्या विश्वावर उमटले.
काय करू?
आतली शल्य उघड बोलता येत नाहीत कधी
धुमसत राहतात आतल्या आत...
वर कर्तव्य आणि जबाबदारीने शांत स्वरूप धरलेलं असतं
तेव्हा त्यांना आठवण राहत नाही माझ्या अस्तित्वाची...
त्यांच्याशिवाय मी नाही असं नक्कीच नाही
मी स्वयंभू आहे!

आपण जे विश्व मायेने सांभाळतो
त्यालाच जेव्हा आज तडा गेला आहे,
आज त्यांनी माझ्या अस्तित्वाचा बोलबाला केला आहे.
तेही स्वयंभू आहेत
पण एकत्र बांधलो गेलो आहोत आम्ही नैसर्गिक नात्याने.
त्यालाच जेव्हा आज तडा गेला आहे,
आज त्यांनी माझ्या अस्तित्वाचा बोलबाला केला आहे.
तेही स्वयंभू आहेत
पण एकत्र बांधलो गेलो आहोत आम्ही नैसर्गिक नात्याने.
त्यांना बोलून भाव व्यक्त करता येतात...
माझं काय?
माझं काय?
क्षमा मागावी असा गुन्हा मी नाही केला,
पण त्यांच्या अश्रूंचं ओझं मात्र झालं आहे...
दुःख झालं आहे,
माझा अंतरातील कंप त्यांना भोगावा लागत आहे...
जीव लावलाय ज्यांवर त्यांना माझं शल्य बोचू नये,
माझ्या दुःखाचं माप त्यांनी मोजू नये...
पण त्यांच्या अश्रूंचं ओझं मात्र झालं आहे...
दुःख झालं आहे,
माझा अंतरातील कंप त्यांना भोगावा लागत आहे...
जीव लावलाय ज्यांवर त्यांना माझं शल्य बोचू नये,
माझ्या दुःखाचं माप त्यांनी मोजू नये...
वाटतं, माणूस असते तर पश्चात्ताप व्यक्त करता आला असता;
त्यांच्या अश्रूंना माझ्या अश्रूंनी सावरता आलं असतं.
त्यांच्या अश्रूंना माझ्या अश्रूंनी सावरता आलं असतं.
दुःख मोठं जितकं तितका मोठा हादरा बसतो
त्यांनी सांभाळून घ्यावा एवढा क्षुल्लक तो नसतो.
अपेक्षा नसते माझीही त्यानी मला सावरावं,
जे त्यांना शक्य नाही तो माझा हट्टही नसतो...
म्हणूनच कदाचित वेगळी असून मी त्यांची आहे
त्यांच्यासोबत आज मी ही हादरून कोसळून गेले आहे.

माझे शल्य त्यांचे अश्रू दोन्ही वाहून गेले आहे
पुन्हा शांत अंतराने दुःख साहून नेले आहे.
पुन्हा शांत अंतराने दुःख साहून नेले आहे.
-
सोनल