आयुष्य हे वाहत्या झऱ्यासारखं आहे... प्रारंभापासून निर्मळ, खळाळतं!
आपल्याला खूप मोठं वरदान आहे की आपण वाहत्या आयुष्याची चव सुद्धा वाहता
वाहता चाखू शकतो.
वाटेत काही फ्लेवर्स ॲड होत राहतात. ती बरेचदा आपलीच माणसे असतात, बरेचदा अनोळखी... बरेचदा काही प्रसंग असतात; आपल्यावर आलेले किंवा जवळपास झालेले...
वाटेत काही फ्लेवर्स ॲड होत राहतात. ती बरेचदा आपलीच माणसे असतात, बरेचदा अनोळखी... बरेचदा काही प्रसंग असतात; आपल्यावर आलेले किंवा जवळपास झालेले...
काही चवी आवडतात... खूप... कधी ते सरबती मिश्रण
संपूच नये असं वाटतं. पण यांचा आनंद आणखी हवा असं वाटेपर्यंत कडू चव
लागते... आपली काय चूक? आपण फक्त वाहत राहतोय. वाटेत काय येणार याची जबाबदारी
आपली थोडीच? ती चव त्या घटनांची असते... हो, पण ती चव सुद्धा चाखून न रडता
पुढे वाहणं गरजेचं आहे. अडलं, रडत असो वा हसत, की खळाळणं थांबतं.
निर्मळपणा हादरतो. त्यापेक्षा आहे तो झरा न अडता वाहत ठेवायचं काम आपण करुच
शकतो. गोड घटनांचे आभार सौख्य दिल्याबद्दल आणि कटू घटनांचे आभार अनुभवाचं
शहाणपण दिल्याबद्दल!
जी माणसं खरोखर आपली असतात ती दुधात साखर
विरघळल्याप्रमाणे आपल्या नीर-सागराला क्षीर-शर्करा सागराचे रूप देऊन
आपल्यासोबत वाहत राहतात. त्यांच्या या सोबत असण्याचा आदर राखून आपणही
त्यांच्या झऱ्यासाठी शर्करेचं कार्य करत वाहायचं...
आणि यातलं काहीच जन्मापासून आपलं नसल्याने, आपल्या आयुष्याचा निर्मळ झरा न अडवता वाहवत आपला प्रवास सुखकर करायचा एवढंच आपलं जीवितकार्य!
आणि यातलं काहीच जन्मापासून आपलं नसल्याने, आपल्या आयुष्याचा निर्मळ झरा न अडवता वाहवत आपला प्रवास सुखकर करायचा एवढंच आपलं जीवितकार्य!
आयुष्य हे वाहत्या
झऱ्यासारखंच आहे... प्रारंभापासून निर्मळ, खळाळतं असलेल्या या झऱ्याला
अनुभवांनी प्रौढ करूनदेखील ते सौंदर्य अंतापर्यंत आपण राखायचं असतं... सगळे
फ्लेवर्स चाखून सुद्धा लक्षात ठेवायचं असतं, सरबतावर तहान भागवणारं हे
शुद्ध पाणीच असतं!
सोनल