About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Wednesday, 7 June 2017

चहा


(आदरणीय सौमित्र यांची साभार क्षमा मागून "पावसा"ची जागा "चहा"साठी वापरत आहे.)  

त्याला चहा आवडत नाही,
तिला चहा आवडतो.
चहाची वेळ झाल्यावर तो 
तिच्या तावडीत सापडतो. 

"मी तुला आवडते, पण चहा आवडत नाही
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.

                                               चहा म्हणजे पित्ताला कार, चहा म्हणजे जळजळ
चहा थकल्या जीवाला उभारी, चहा ताजा दरवळ. 
                                              चहा उष्णता वाढवतो, चहा वैतागवाडी
चहा डोक्याच्या तापातून मुक्ती, चहा अमृताची गोडी.
                                           चहा टवाळकीची कामं, चहा म्हणजे टाईमपास उगाच 
चहासोबत एकजीव होऊन मनाला येतो उत्साह खास."

दररोज चहाची वेळ येते, दररोज असं होतं,
चहावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं. 
चहा आवडत नसला तरी, ती त्याला आवडते 
चहासकट आवडावी ती, म्हणून ती ही झगडते. 
रुसून मग ती खटटू होते, हरवते वाफाळत्या चहात 
त्याचं तिचं भांडण रोज कपभर चहाच्या मोहात.


- चहाप्रेमी,
सोनल

Wednesday, 12 April 2017

'...हा'

हा म्हणजे खूपच भारी आहे बुवा...

भले भले ढेपाळलेले खाड्कन् जागवतो;
उर्जेसाठी आसुसलेल्यांची तहान
हा अगदी मनापासून भागवतो.


याला घेतल्याशिवाय सकाळ होऊच शकत नाही,
हा सोबत असला तर रात्र सुद्धा थकत नाही.
हा म्हणजे खूपच भारी आहे बुवा...

एकदा सवय झाली की
याच्याशिवाय राहवत नाही ,
दुष्काळात कधी हा सापडलाच तर
आनंद गगनात मावत नाही.


अड्डयावर 'चांडाळ-चौकडी' सोबत टवाळगिरी करताना,
टपरीवर त्या एका 'स्पेशल' सोबत उगाच गप्पा मारताना,
एकांतात बसून आपल्याच राज्यात ऐलापासून पैलापर्यंत फिरताना,
मनाच्या सगळ्या टप्प्यांवर एकमेव निःपक्ष साक्षीदार -
हा, खूपच भारी आहे बुवा...

मौसम कुठलाही असो, याचा मान सर्वत्र


तरी पावसात जरा जास्त
च खाऊन जातो भाव;
भलता रसिक, भलताच कडक, मेलेल्या मूड ला संजीवनी देणारा
याला अमृततुल्य उगाच म्हणतात का राव...!

हा म्हणजे जरा जास्तच भारी आहे बुवा...
आम्हा चहाबाजांना वेळेला "चहा"च हवा ! ;)


-
              सोनल 
                          :)

Friday, 20 January 2017

शाम


शाम उतर रही है 
हलके हलके कदमों से ज़मीं पर 
किरनें छुडा रही है 
अपने हाथ हलके हलके...

अमन ने थाम लिये अब शाम के हाथ 
नूर बन कर बरस रहीं है चाँदनी भी
शाम की आँखों से अब
छलक रही है ख़ुशी हलके हलके...

इनायत है शाम ख़ुदा की 
छा रही है हलके हलके
थके हारे दिन को 
भा रही है हलके हलके...

कदम बढ़ाती शाम 
ढलेगी रूप में रात के 
उसकी गोद में करवट लेकर
चैन से साँस लेगा दिन हलके हलके...


:) 
  
सोनल