पाऊस
फक्त बरसतो;
आपण
आपण
कधी रडतो,
कधी हसतो,
कधी नुसतेच स्तब्ध होतो
या पावसात भिजून...
कधी हसतो,
कधी नुसतेच स्तब्ध होतो
या पावसात भिजून...
कधी पावसात भिजून वाहून गेलेली,
लगदा झालेली
स्वप्नं आठवून;
कधी पावसात साठलेल्या डबक्यांत दूरवर
डौलात जाणाऱ्या आपल्या कागदी स्वप्नील होड्यांचा
तांडा आठवून...
कधी कागदंच नाही म्हणून
कोऱ्या कल्पनांच्या होड्या
पावसात पाठवून...!
---
पाऊस
फक्त रुजवतो;
आपण
कधी अडतो,
कधी वाहवतो,
कधी जिरतो,
या पावसात फसून...
कधी पावसात चिंब होऊन
ओल्या आठवणींना
उराशी कवटाळून;
कधी पावसात झिंगून
हृदयाच्या कप्प्यांना आप्तांसमोर
निरागसपणे रिते करून...
कधी आपले बरसणे झेलायला धराच नाही म्हणून
आपणंच आपल्याला
सावरत जाऊन...!
---
पाऊस
फक्त हसतो;
उंचाहून उड्या तो घेत असतो
आणि पडत-धडपडत मात्र आपण असतो.
लगदा झालेली
स्वप्नं आठवून;
कधी पावसात साठलेल्या डबक्यांत दूरवर
डौलात जाणाऱ्या आपल्या कागदी स्वप्नील होड्यांचा
तांडा आठवून...
कधी कागदंच नाही म्हणून
कोऱ्या कल्पनांच्या होड्या
पावसात पाठवून...!
---
पाऊस
फक्त रुजवतो;
आपण
कधी अडतो,
कधी वाहवतो,
कधी जिरतो,
या पावसात फसून...
कधी पावसात चिंब होऊन
ओल्या आठवणींना
उराशी कवटाळून;
कधी पावसात झिंगून
हृदयाच्या कप्प्यांना आप्तांसमोर
निरागसपणे रिते करून...
कधी आपले बरसणे झेलायला धराच नाही म्हणून
आपणंच आपल्याला
सावरत जाऊन...!
---
पाऊस
फक्त हसतो;
उंचाहून उड्या तो घेत असतो
आणि पडत-धडपडत मात्र आपण असतो.
आपण शहारून बरसू लागतो तेव्हा
हाच पाऊस डोळ्यांतून वाहू लागतो...
आनंद- दुःख नाव नसतं त्याला काही
तो फक्त पाऊस असतो!
हाच पाऊस डोळ्यांतून वाहू लागतो...
आनंद- दुःख नाव नसतं त्याला काही
तो फक्त पाऊस असतो!
आपल्या वर्षावात नकळत कधी
पाऊस ही चिंब चिंब होऊन जातो;
पाऊस ही चिंब चिंब होऊन जातो;
पाऊस होऊन
पावसात कधी
आपण
फक्त बरसतो...!
पावसात कधी
आपण
फक्त बरसतो...!
-
:)
सोनल
