(कवितेतील नावे ही कोणाही व्यक्तीला उद्देशून वापरलेली नसून फक्त एक
गम्मत म्हणून शब्दखेळ मांडला आहे याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.
धन्यवाद !)
शेकू म्हणे काय ठेवले नावात?
नाव नोहे खरे, खरे अस्तित्व जगात!
सोनू म्हणे, चोख तव शब्दांचा महिमा
आजच्या युगात सुनैना लावी चष्मा
भिकाऱ्याचे नाव राजा, दरोडे घाली राम
बोक्याचे नाव बंड्या आणि मालक टॉम
अविश्वासू विश्वास, विवेक अविचारी
राणी कवडीचुम्बक, जीवन मारेकरी
अभय भित्रेबुवा, भारती देशद्रोही
इथे ऐश्वर्य दरिद्री, सुखीला सुख नाही
रसिक अरसिक, प्रीती कडकलक्षुमी
सुहास हा उदास, विद्याला डोकं कमी
बाबा शेक्सपिअरा, खेळ आटोपते सारा
तुझ्या सत्याला पुरावा हा नावांचा पसारा
आम्ही लहान माणसे, तुम्ही फारंच महान
तरी वाटले करावे थोडे शब्दांचे मंथन!
-
:)
सोनल
धन्यवाद !)
शेकू म्हणे काय ठेवले नावात?
नाव नोहे खरे, खरे अस्तित्व जगात!
सोनू म्हणे, चोख तव शब्दांचा महिमा
आजच्या युगात सुनैना लावी चष्मा
भिकाऱ्याचे नाव राजा, दरोडे घाली राम
बोक्याचे नाव बंड्या आणि मालक टॉम
अविश्वासू विश्वास, विवेक अविचारी
राणी कवडीचुम्बक, जीवन मारेकरी
अभय भित्रेबुवा, भारती देशद्रोही
इथे ऐश्वर्य दरिद्री, सुखीला सुख नाही
रसिक अरसिक, प्रीती कडकलक्षुमी
सुहास हा उदास, विद्याला डोकं कमी
बाबा शेक्सपिअरा, खेळ आटोपते सारा
तुझ्या सत्याला पुरावा हा नावांचा पसारा
आम्ही लहान माणसे, तुम्ही फारंच महान
तरी वाटले करावे थोडे शब्दांचे मंथन!
-
:)
सोनल
