About Me

My photo
Nature Lover, Traveller, Astronomer, STEM Educator, Teacher Educator, Science Communicator, Writer and Lifelong Learner

Friday, 12 October 2018

मेंदी आणि ती

हातांवर काढलेली मेंदी कायम ओलीच राहावी असं वाटतं 'ती'ला.
ओल्या मेंदीचा रंग, ओल्या मेंदीचा सुगंध, ओल्या मेंदीचा स्पर्श...
सारं कसं खूप खूप भावतं.

पण ती ही आयुष्याचा दाखला द्यायलाच समोर येते जणू...
हळू हळू सुकणार,
थोडी थोडी खपली होऊन निघणार,
चित्राला छान गडद रंग चढणार
आणि...
कालांतराने हवेत विरून जाणार!
आणि तरीही 'ती' पुन्हा नव्याने स्फुरेल तेव्हा हातांवर मेंदी काढत बसलेली दिसणार.


😊
सोनल