कालचा चांदोमामा
आज चंद्र झालाय,
कालचा बागुलबुवा
आजची मस्करी झालाय.
कालची चिऊताई
आजची चिमणी झालिये,
कालची जिवलग बाहुली
आज फक्त खेळणं झालिये.
कालचा निरागस स्वभाव
आज बालिशपणा झालाय,
कालचा सूर्यच उगवता होता
आज माध्यान्ही आलाय.
आज १४ नोव्हेंबरच्या निमित्ताने
काल आणि आजमध्ये पलटलेल्या काही तासांची पानं डायरेक्ट स्किप करुयात,
आणि आपलं कालचं चिमुकलं सुख आजच्या बालदिनी मोठ्या मनाने आभाळाएवढं जगुयात.
HaPpY ChIlDrEn'S DaY :)
✍🏼© सोनल थोरवे

No comments:
Post a Comment