(आयसर पुणे येथील एका शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात श्री. श्रीरंग गोडबोले यांचं एक edutainment सत्र झालं. त्यात त्यांनी दिलेल्या काही challenges पैकी एक कार्बनच्या चक्रावर 5 मिनिटांत काहीतरी सोपं लिहिणे. यात कोण कोण कविता, गाणी करतं त्यांना पुढचं challenge गाणं लिहून दाखवा, सुरुवात लिहिली तरी चालेल, पूर्ण नंतर करा.
20 वर्षांपूर्वी शाळेत शिकलेलं कार्बन चक्र, ते ही इंग्रजीत, आता शब्दांत उतरवायचं, ते पण 5 मिनिटांत म्हणजे खरंच challenge. त्यातून कविता स्वतः होऊन होते तेव्हाच लिहिणारे आम्ही, म्हणजे आणखी अवघड.
दिलेल्या विषयावर दिलेल्या वेळेत काही लिहिणं हे आव्हान स्वीकारून स्वतःच्या सवयींशी झगडत दिल्या वेळेत पूर्ण केलेली आणि सर्व शिक्षकमित्रांना आवडलेलं हे गाणं, सध्या चाल-less असलेलं. कोणा शिक्षकमित्रांना याला चाल लावता आली तर सहर्ष स्वागत.)
"कार्बन ची चक्की म्हणजे काय नक्की?"
"कुठे कुठे असतो कार्बन सांग बरं, अक्की."
"दगड, झाडे, हवा, सजीव सगळ्यांमध्ये कार्बन
कुठे पण जा धरतीपाठी रुरल किंवा अर्बन."
"हाच कार्बन बरं का अक्की, असा फिरत राहतो;
इकडून तिकडे, तिकडून इकडे चक्रात हा वाहतो.
हवेतला कार्बन डायऑक्साइड झाडे शोषून घेतात,
मदतीने सूर्यप्रकाश अन् पाण्याच्या साखर तयार करतात.
साखरेच्या रुपात ऊर्जा आणि बाहेर ऑक्सीजन सोडतात,
साखरेची ऊर्जा शाकाहारी प्राण्यांना ते देतात.
मांसाहारी प्राणी शाकाहाऱ्यांना खातात,
ते गेले की त्यांना पुन्हा विघटक संपवायला असतात.
विघटन होऊन मृत शरीराचे कार्बन मातीत जातो,
प्रत्येक सजीवाच्या उच्छवासाने कार्बन हवेत जातो.
मातीत झाडे उगवतात अन् कार्बन फिरून राहतो,
याच मातीत आपण सारे उगवतो नी संपतो.
अशी सतत फिरत राहते कार्बन ची ही चक्की,
मातीतले आपण मातीत जातो कार्बन सारखे, अक्की."
✍🏼 सोनल थोरवे

खूपच छान कविता, कार्बन चक्र या कवितेतून नक्की तोंडपाठ होईल, मी या कवितेचे सुलेखन करून वर्गात तुमच्या नावसाहित चार्ट लावणार, परवानगी दयावी
ReplyDeleteधन्यवाद सर!!! नक्कीच, खूप छान वाटेल
Deleteही कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून उपयोगी पडली तर.
खूपच छान .
ReplyDeleteविज्ञान आणि कवितेचा तसा काही संबंध नाही असे म्हणतात . परंतु विज्ञानाला कवितेमध्ये गुंफून विज्ञानाची रसिकता वाढवणारी ही कविता ,नक्कीच अध्ययन-अध्यापन आला प्रेरित करेल यात शंका नाही .
खूप खूप अभिनंदन!
धन्यवाद सर!!!
Delete