मेघ धावते झरती झरझर
गगनी तिकडे काहूर काहूर
दूर तरीही इकडे थरथर
कृष्णसावळी संध्या श्यामल।
पहाट ती ही धूसर धूसर
वाऱ्यावरती भाव ओलसर
वाहून येति असे दूरवर
उगवतीस ही काजळ काजळ।
माध्यान्ही ही राजा जलधर
त्याच्या मागे लपला रविकर
कुठे किनारी उसळे सागर
कोसळती घन वृक्ष धरेवर।
चालून जाता अफाट अंतर
वाटा तुडवून येता ओसर
सरता तांडव उरतो जलथर
सावरता मावळते वादळ।
✍ सोनल




सुरेख... चक्रीवादळाचे positive effects 😃🙌
ReplyDelete:) thank you!
Delete