आपल्यासमोर सतत हसणारे तर खूप असतात;
पण आपल्या मिठीत शिरून रडणारे कोणी हवे...
यातून जाणवतो मला माझ्यावरचा विश्वास!
पण आपल्या मिठीत शिरून रडणारे कोणी हवे...
यातून जाणवतो मला माझ्यावरचा विश्वास!
टाळ्या देऊन, मिठ्या मारून दिल खुश करणारे खूप असतात;
पण आपला हात हातात धरून तासन् तास उगाच बसणारे कोणी हवे...
यातून जाणवते मला माझ्या सहवासाची आस!
पण आपला हात हातात धरून तासन् तास उगाच बसणारे कोणी हवे...
यातून जाणवते मला माझ्या सहवासाची आस!
गोड बोलून समोर आपले मन सांभाळणारेही खूप असतात;
पण भांडून पुन्हा आपल्याच कुशीत शिरून
पण भांडून पुन्हा आपल्याच कुशीत शिरून
आपलीच तक्रार आपल्याकडे करणारे कोणी हवे...
यातून जाणवतो मला मैत्री टिकवून धरण्याचा ध्यास!
यातून जाणवतो मला मैत्री टिकवून धरण्याचा ध्यास!
असा मित्र मिळावा कोणी योगी,
मोही-निर्मोही नात्यांच्या पलिकडला जोगी...
स्वार्थापल्याडच्या मनातल्या कप्प्यात
साकार-निराकार-सगुण-निर्गुण,
मोही-निर्मोही नात्यांच्या पलिकडला जोगी...
स्वार्थापल्याडच्या मनातल्या कप्प्यात
साकार-निराकार-सगुण-निर्गुण,
असावा कोणी मित्र
आपल्या अस्तित्वाचा
निःस्वार्थ भोगी!
-
:)
सोनल

No comments:
Post a Comment