(तो दिवस ०३ जुलै २०१४ होता, आणि आज १७ ऑगस्ट २०१५... परिस्थिती दुर्दैवाने अगदी जशीच्या तशी :(
आषाढ, अधिक कोरडेच गेले; श्रावणात तरी बरसा रे कृष्णमेघांनो.......)
पावसा पावसा कधी येशील भरून?
मान दुखाया लागली वर बघून बघून.
काळे काळे ढग येती मध्ये तोंड दाखवाया
आशेला पुरते दृश्य पंख फुटावया..
वारासुद्धा येतो, छान वाटते क्षणिक
पुन्हा येते उन्ह, सारे भासते भ्रामक.
चार थेंबांचा करून धरेवर शिडकावा
उपकाराच्या तोऱ्यात जाई मेघांचा हा थवा..
जीव त्रासला, ग्रासला उन्ह पिउन पिउन
मेघा बरस रे आता तरी ओंजळी भरून..
आटलेल्या नद्या आणि कोरडी धरणे,
आता भर जीवनाने, ऋणी राहील हे पुणे...!
-
तुझी
चातकासारखी वाट पाहणारी,
सोनल
आषाढ, अधिक कोरडेच गेले; श्रावणात तरी बरसा रे कृष्णमेघांनो.......)
पावसा पावसा कधी येशील भरून?
मान दुखाया लागली वर बघून बघून.
काळे काळे ढग येती मध्ये तोंड दाखवाया
आशेला पुरते दृश्य पंख फुटावया..
वारासुद्धा येतो, छान वाटते क्षणिक
पुन्हा येते उन्ह, सारे भासते भ्रामक.
चार थेंबांचा करून धरेवर शिडकावा
उपकाराच्या तोऱ्यात जाई मेघांचा हा थवा..
जीव त्रासला, ग्रासला उन्ह पिउन पिउन
मेघा बरस रे आता तरी ओंजळी भरून..
आटलेल्या नद्या आणि कोरडी धरणे,
आता भर जीवनाने, ऋणी राहील हे पुणे...!
-
तुझी
चातकासारखी वाट पाहणारी,
सोनल

No comments:
Post a Comment