डोंगराशी मैत्री करायला जिगर लागते
कधी त्याचा सहनशक्तीचा संयम कोसळलाच
तर त्याला कुशीत झेलायला मोकळ्या मनाची दरीच लागते.
कधी त्याचा सहनशक्तीचा संयम कोसळलाच
तर त्याला कुशीत झेलायला मोकळ्या मनाची दरीच लागते.
सागराशी मैत्री करायला हिंमत लागते
कधी आल्याच उफाळून बेभान भावनांच्या उंच लाटा
त्यांना छातीवर घेऊन सावरायला दिलदार रेतीची किनारच लागते.
कधी आल्याच उफाळून बेभान भावनांच्या उंच लाटा
त्यांना छातीवर घेऊन सावरायला दिलदार रेतीची किनारच लागते.
आकाशाशी मैत्री करायला निधडे काळीज लागते
सारं मन घेऊन आभाळ कोसळले तरी
त्याला रुजवून कवेत घ्यायला क्षितिजाला धावणारी धरणीच लागते.
सारं मन घेऊन आभाळ कोसळले तरी
त्याला रुजवून कवेत घ्यायला क्षितिजाला धावणारी धरणीच लागते.
-
सोनल
:)

No comments:
Post a Comment