एक सावळा अलगद आला
तापलेला सूर्य मवाळ झाला,
ओल्या गारव्याची चाहूल लागली
जून जसा मिरवत आला।
प्लेन निळे झबले सोडून
ढगांनी सजलेला झगा घातला,
आकाशाने पावसाळ्याला
पुन्हा नव्याने सलाम ठोकला।
काही दिवस आनंद लुटायला
उन्हें देखील तयार झाली,
सरींसोबत न्हाऊन निघायची
जय्यत तयारी सुरू झाली।
किरणांसोबत लपंडाव खेळायला
सरी सुद्धा आतुर झाल्या,
त्या झेलायला धरणीच्याही
मनात हुरहुरी गोड दाटल्या।
आमच्या शाळा उघडू लागल्या
अन् उन्हाच्या शाळेला सुट्ट्या लागल्या,
ढगांच्या पाट्या फोडायला आता
पावसाच्या सरी अधीर झाल्या।
:)
पाउसवेडी ;)
सोनल.
तापलेला सूर्य मवाळ झाला,
ओल्या गारव्याची चाहूल लागली
जून जसा मिरवत आला।
प्लेन निळे झबले सोडून
ढगांनी सजलेला झगा घातला,
आकाशाने पावसाळ्याला
पुन्हा नव्याने सलाम ठोकला।
काही दिवस आनंद लुटायला
उन्हें देखील तयार झाली,
सरींसोबत न्हाऊन निघायची
जय्यत तयारी सुरू झाली।
किरणांसोबत लपंडाव खेळायला
सरी सुद्धा आतुर झाल्या,
त्या झेलायला धरणीच्याही
मनात हुरहुरी गोड दाटल्या।
आमच्या शाळा उघडू लागल्या
अन् उन्हाच्या शाळेला सुट्ट्या लागल्या,
ढगांच्या पाट्या फोडायला आता
पावसाच्या सरी अधीर झाल्या।
:)
पाउसवेडी ;)
सोनल.

No comments:
Post a Comment