(साला, ही 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिका छळते... इतकी गोड मैत्री समोर दाखवते आणि मला माझ्या मित्रांच्या आठवणीने बेजार करून सोडते... हा हा हा!
आज थोडेसे फक्त माझ्या मित्रांसाठी...)
"डोळ्यांतल्या अश्रूंचं रूप केव्हा हास्यात पलटवेल,
तुमच्या नकळत हळूवार तुमच्या पायात रुतलेला काटा काढेल,
कळणार देखील नाही तुम्हाला अशी किमया करून
'मित्र' नावाचा किमयागार जीवनात सुखद क्षणांचं नंदनवन फुलवेल."
सच्च्या मित्राची याहून वेगळी ती ओळख काय असेल? तुम्ही अडचणीत आहात, दुःखात आहात वा वैफल्यग्रस्त आहात, याच मित्रांचे खांद्यावरचे आश्वासक हात अशा वेळी मनाला उभारी देत असतात. सुखा-समाधानाच्या वेळी तुम्हांला हसताना पाहून त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळून जातात. अशा मैत्रीच्या डिक्शनरित 'स्वार्थ' हा शब्दच नसतो.
"निरभ्र आकाशासारखी सुंदर ती मैत्री
मनावरचं मळभ दूर करणारा तो मित्र!"
जगाच्या पाठीवर असणारं सगळ्यांत अनमोल रत्न म्हणजे मैत्री! कोणाला कधी कुठे गवसेल सांगता येत नाही. मैत्रीला वय नाही, नात्यांचं बंधन नाही. निखळ प्रेम म्हणतात ते फक्त मैत्रीतच असू शकतं. मैत्रीच्या या देशात फक्त मित्राला समजून घेणं असतं. त्यांना भाषेचं बंधन नसतं, कारण ते डोळ्यांतून डोकावून हृदयाची भाषा वाचतात.
इथे मनाचा कठोरपणा सुद्धा मायेच्या ओलाव्यापोटीच असतो. जिथे मित्र चुकतो तिथे आधी आपल्या मनावर दगड ठेवून मग त्याला शिक्षा सुनावली जाते. या देशाचं सारं गणितंच न्यारं असतं. इथे एक अधिक एक एकंच होतात, अन् भावनांचं शेअरिंग करून स्ट्रॉन्ग कोवॅलंट बॉन्ड बनतात.
खरंच नशीब लागतं या देशाचा व्हिसा मिळायला. कारण, आजच्या धावपळीच्या युगात बऱ्याच जणांना फुरसदच नसते तिकडे डोकवायला. आज हे लिहायचं फक्त निमित्त! मला माझ्या दोस्तांबद्दल काय वाटतं हे कधी तरी नको का त्यांच्यापर्यंत पोहचायला?
"छोटे-मोठे भांडण तंटे सगळ्यांमध्ये होत असतात,
अहंकार बाजूला ठेऊन जे हे विसरतात अन्
पुन्हा दुसऱ्या दिवशी गळ्यांत हात घालून शीळ घालत
'चल यार कालचं सोड, आजचा प्लॅन काय?' म्हणतात
ते खरे मित्र असतात.
आई-वडील भावंडांप्रमाणेच ते
आपल्या जीवनाचा एक हिस्सा असतात
आयुष्याच्या शेवटीही मनाला आठवांच्या रूपाने
सुखावणारा एक किस्सा असतात.
त्यांचा न सांगता धरलेला अबोला
काळीज चिरून टाकणारा असतो
त्यांच्यापासून दूर असताना आपण
त्यांनाच आठवून कधी रडतो, कधी हसतो..."
अशा या साऱ्या मैत्रांचे माझ्या जगण्याला असलेले योगदान मी कधीच नाकारणार नाही;
त्यांना आज ऐवढीच कबूली देऊ शकते,
त्यांच्याशिवाय माझं सुंदर जीवनाचं स्वप्न कधीच साकारणार नाही.
:)
तुमची
सोनल.

No comments:
Post a Comment