ती
कविता एकाकी
कळकळीने
शोधणारी
कोणी
न तुडवलेल्या वाटा...
निसर्ग सौंदर्याच्या शोधात
स्वतः देखील नि:सर्गच राहिलेली
एक कविता...
रानातल्या
अनोळखी फुलाप्रमाणे
गुलाबासारखं
कौतुक वाट्याला न आलेली
ती
एक रंगीत कविता...
उदय-अस्त आत्मीयतेने अनुभवणारी
काळोखाच्या आडून येणारा प्रकाश जोखणारी
एक आतुर
कविता...
काटे-फुलं तुडवत
वाऱ्यावर
शब्दांना खेळवत
वाचक
सांगातीची आस बाळगून
आपल्या
वाटा धुंडाळणारी
ती
कविता... सृजनाची
-
कोरी तरीही भारलेली
जीवनाच्या नशेत गर्क
हर पळ
नव्याने जगणारी - ती कविता
एकाकी!
-
:)
सोनल

No comments:
Post a Comment