...
काही कौतुक करावं असं खरं तर आठवत ही नाही.
आवर्जून आठवतो आहे तो दिवस, जेव्हा त्या बाईंनी अंगावर खेकसून वर्गासमोर, आईसमोर तोंडावर फेकून मारली होती अभ्यासवही.
कारण? आजोबा देवाघरी गेल्याने कित्येक दिवस पोरीला शाळेत जाता आलं नाही.
अभ्यास आवडायचा म्हणून जमेल तशी, जमेल तेवढी पूर्ण केली होती तरी बिचारीने ती वही.
धसका बसला शाळेचा, अभ्यासाचा, त्या बाईंचा, आणि सारखं दुखायला सुरू झालं छातीत.
तेव्हा डॉक्टरनी काय विचारावं माहीत आहे?
"इवल्याशा वयात या पिल्लाला हायपर टेन्शनचं दुखणं कुणी दिलं, आई?"
आई-बाबांनी, पूर्वीच्या वर्गांतल्या बाईंनी शाळा आवडावी म्हणून घेतलेली मेहनत अशी विरून गेली हवेत.
वय वर्ष? अवघं आठ.
बोलणं बंद, एकलकोंडेपण सुरू, शाळेत गेली असेल पुन्हा ती, फक्त इलाज नाही म्हणून;
नाहीतर, अशी शाळा???... नकोच गं बाई!
✍🏼⚡©सोनल थोरवे
(on behalf of "that unfortunate child")

No comments:
Post a Comment