आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें
शब्दांचीच शस्त्रे यत्नें करूं ll
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन
शब्दें वाटूं धन जनलोकां ll
तुका म्हणे पहा शब्द चि हा देव
शब्दें चि गौरव पूजा करूं ll
- संत तुकाराम
नमस्कार मित्र हो!
शब्दांबद्दल थोर संत तुकाराम यांनी मोजक्या शब्दांत इतके काही लिहिले असता आम्ही बापडे आणखी काय बोलू जाणार?
शब्दवेड्या जीवांना माझ्या भावना नक्कीच समजल्या असतील.
अशाच काही आमच्या, काही तुमच्या भावनांचे रंग शब्दरूपात उतरविण्याचा हा आमचा लहानसा प्रयत्न.
भाव आणि शब्द यांची सांगड घालण्याचा हा खटाटोप आपल्या पसंतीस उतरेल अशी आशा! :)
सुधारणेसाठी करण्यात येणारया सूचना आणि कल्पनांचे स्वागत आहे.
-
:)
सोनल किशोर थोरवे.

No comments:
Post a Comment