आज प्राजक्त मुक्त बरसला...
तसा दर पहाटेचा बरसतोच;
आज तो मला दिसला.
तसा दर पहाटेचा बरसतोच;
आज तो मला दिसला.
थांबले जाऊन त्याखाली...
टपटप पडणारी केशरी पांढरी फुले
त्यांचा धुंद परिमळ
पार काळजात जाऊन हसला.
माझी सकाळ सुगंधी झाली,
कृत्रिम मुखवट्यांचा विसर पडला.
वाटलं,
'रोज, नाही, सतत इथेच बसावं
या प्राजक्ताच्या निर्मम सान्निध्यात
त्यासारखं किंचित जगता येत का पहावं.'
'रोज, नाही, सतत इथेच बसावं
या प्राजक्ताच्या निर्मम सान्निध्यात
त्यासारखं किंचित जगता येत का पहावं.'
तर म्हटला,
'रोज नको
पण येत जा अधुन-मधून;
अंधारानंतरच्या प्रकाशाची मौज काही औरच असते.
नेहमी हा काळा पत्थर सुस्त पडून राहतो
तुझ्यामुळे आज खुलून हसताना पाहिला.
तुझ्यामुळे आज खुलून हसताना पाहिला.
मला सुद्धा मिळू देत तो आनंद
असाच तुझ्यासारखा,
निर्मळ सचेत
निद्रिस्त अचेताला मिळण्याआधी
जागृत चैतन्यावर बरसण्याचा...!'
आज प्राजक्त मुक्त बरसला...
-
सोनल :)


सुंदर लिहेलंय, प्राजक्ताच्या फुलासारखं .
ReplyDeleteधन्यवाद अभयजी _/\_
Delete